Available Treatment And Facilities
लाईफ क्युअर कम्पोझीट मटेरिअल
लाइट क्युअर कंपोझीट मटेरिअल हे एक आधुनिक डेंटल फिलींग मटेरियल आहे जे अगदी दातासारखेच दिसते. इतर पारंपारीक मटेरियल उदा. चांदी, सिमेंट इत्यादी पेक्षा याची ताकद आणि टिकण्याची क्षमता किती तरी पटीने जास्त असते. कंपोझीट हे दंतशास्रातील चमत्कारच म्हणता येईल कारण हे मटेरियल कोणत्याही दातामध्ये आणि कोणत्याही ठिकाणी भरता येते. नवीन नॅनोटेक्नॉलॉजीमुळे कंपोझीट फीलिंग्स ह्या हुबेहुब दाता सारख्या दिसतात.
डेंटल इम्प्लांटस
डेंटल इम्प्लांट हि काढलेले/नसलेले दात बसविण्याची नवीन आणि सर्वात आधुनिक पद्धत आहे. डेंटल इम्प्लांटस हे टायटेनियम मटेरियलने बनविलेले असतात.
१) इम्प्लांट – टायटेनियमचा स्क्रू जो हाडामध्ये बसविला जातो.
२) इम्प्लांट अटॅचमेंट – कृत्रीम दात किंवा कॅप यावर बसवते.
३) कॅप किंवा कृत्रीम दात – डेंटल इम्प्लांटसच्या सहाय्याने एक किंवा अनेक दात फिक्स बसवता येतात. इंप्लांटसच्या सहाय्याने पुर्ण कवळी पण आपल्याला फिक्स बसवता येते.
रुट कॅनाल ट्रिटमेंट
किडलेले /खराब दात वाचविण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे रूट कॅनॉल ट्रीटमेंट आजच्या काळात सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना माहित असलेली ही उपचार पद्धत आता नवीन तंत्रज्ञानामुळे आणखी सोयीची आणि परिपूर्ण झाली आहे.
अपेक्स लोकेटर, एंडोमोटर, अल्ट्रासोनिक ॲक्टीवेटेड इरिंगेशन आणि RVG मुळे रूट कॅनाल ही पूर्वीपेक्षा सोपी, झटपट आणि वेदनारहित झाली आहे.
स्माइल डिझायनिंग
आपल्या चेहऱ्यावरील सर्वात जास्त लक्षात येणाऱ्या अवयवांपैकी दाताचा दुसरा क्रमांक लागतो.
म्हणजे आपण कसे दिसतो याला बऱ्याच प्रमाणात आपले दातही कारणीभूत असतात. आधुनिक दंतशास्र हे फक्त दातांच्या आरोग्यावर केंद्रित न राहता आता दातांच्या सौंदर्यावर ही भर देत आहे. लॅमिनेटस, व्हीनीयर्स किंवा क्राऊन व ब्रिजमुळे दातांची ठेवण, आकार आणि रंग ही बदलता येतो. पिवळे दात पांढरे करण्याची प्रक्रिया म्हणजे ब्लिचिंग आता अतिशय सोपी आहे. हिरड्यांचा आकार, रंग हे सुद्धा छोट्या शस्रक्रिया करून बदलता येतात.
डिजीटल स्माईल डिझाइनद्वारे आपण आपले दात आणि पूर्ण स्माईल पण बदलू शकतो. ज्यामुळे आपले आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मोठी मदत मिळते.
उपलब्ध अत्याधुनिक सुविधा
- शहरातील प्रथम आणि एकमेव प्रशस्त आणि अत्याधुनिक दातांचा दवाखाना.
- अत्याधुनिक मल्टिपल ३ ॲटोमॅटीक कॉम्प्युटराईज डेंटल चेअर युनिट.
- स्पे शालिस्ट (M.D.S.)डॉक्टरांसाठी स्वतंत्र कॅबिन/सुसज्ज सर्जिकल रूम (O.T.) OPG/CBCT फु्ल माऊथ एक्सरे रूम.
- झटपट एक्सरे काढणारे आणि अत्यंत कमी रेडिएशन असलेले डिजीटल एक्स-रे मशीन (RVG)
- रोटरी एंडोडोंटिक्स सिस्टीम, जलद आणि अचूक रूट कॅनॉल ट्रीटमेंटसाठी इंट्राओरल कॅमेराद्वारे इंट्राओरल इमेजिंग.
- ऑटोक्लेव्ह, UV चेंबर, ग्लासबीड स्टरीलायझर आणि अल्ट्रासोनिक क्लीनरच्या साहाय्याने सर्व अवजारांचे आणि क्लिनिकचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण.
उपलब्ध अत्याधुनिक दंतोपचार
- डेंटल इम्प्लांट-आधुनिक दंतरोपण पध्दती.
- स्माइल डिझायनिंग लाइट क्युअर, कंपोझिट, झिरकोनिया व्हिनीयर्स,
- लॅमीनेटस अल्ट्रा टी क्राऊन्स आणि डेंटल ब्लिच.
- ॲडव्हान्स रूटकॅनल ट्रिटमेंट Post & Core क्राऊन ब्रिज.
- पोला ऑफिस आणि ओपलेसेन्स टिथ व्हायटनिंग सिस्टीम.
- अल्ट्रासोनिक स्केलर दात साफ व स्वच्छ करण्यासाठी
- अक्कलदाडेवरील शस्रक्रिया, जबड्यांचे फ्रॅक्चरवरील शस्रक्रिया, हिरड्यांच्या आजारांचे निदान व उपचार.
- कृत्रिम दात बसवणे-क्राऊन, ब्रिज, काढता घालता घालता येणारे दात, कास्ट पार्शल डेंचर पुर्ण कवळी Orthodontics Treatment.
- वेडे-वाकडे, पुढे आलेले दात तारेच्या ट्रीटमेंटने दुरुस्त करणे.